मराठा समाज पुन्हा पुकारणार एल्गार ; जळगावात आ.विनायक मेटेंची माहिती

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | २६ ऑगस्ट २०२१ |  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार निष्क्रीय ठरलं आहे. यामुळे येत्या 2 सप्टेंबर पर्यंत जर सरकारने याबाबत काहीही निर्णय घेतला नाही तर 2 सप्टेंबर रोजी शिवसंग्रामतर्फे महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, पाच मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला काही सूचना केल्या होता मात्र ज्या सूचनांची अंमलबजावणी न करता राज्य शासन केवळ एका पाण्यात बसलेल्या म्हशी सारखे थंड बसले आहे.

थंड असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शिवसंग्राम पक्षातर्फे महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. ज्यावेळी प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याच बरोबर गणपती विसर्जन झाल्याझाल्या मुंबईमध्ये उपोषणाला देखील सुरुवात होणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -