fbpx

चाळीसगावातील अकरा गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव शहरात कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांना पुढील काळातील येणारे सण व नगरपालिकेची संभाव्य निवडणूक यामध्ये कायदा व सुव्यवस्थेला अडचण ठरणाऱ्या गुन्हेगारांना जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे नुकतेच शहरातील अकरा गुन्हेगारांना मु पो ॲक्ट कलम 55 वा 57 नुसार हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहे.

या अकरा गुन्हेगारांची पार्श्वभूमी व मागील काळातील त्यांच्या गुन्ह्यांची जंत्री याचा योग्य तपास चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक  सचिन गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील संदीप पाटील यांनी योग्य तो कायदेशीर पाठपुरावा केल्याने खालील अकरा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांना जळगाव जिल्हा,औरंगाबाद,नाशिक, धुळे,नंदुरबार,अशा जिल्ह्यांमधून दोन वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपारीचे आदेश काढण्यात आले.

या आरोपींना केले हद्दपार 
नदीम खान ,साबीर खान, सुलतान शेख, वाजीद खान, शोएब शेख, अक्षय भानुदास पाटील, दानिश शेख, सिद्धांत आनंदा उर्फ अण्णा कोळी, सौरभ आनंदा कोळी, मोहन रमेश चव्हाण, पवन रमेश चव्हाण, रोशन रमेश चव्हाण.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज