खान्देश शिक्षण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक कार्यक्रम नुकताच अध्यक्ष अनिल कदम व चिटणीस प्रा.डॉ.ए.बी.जैन यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार २३ जानेवारीला मतदान तर २४ रोजी मतमोजणी व ३० रोजी निकाल जाहीर होणार आहे.

सविस्तर असे की, खान्देश शिक्षण मंडळाचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक घेण्यात यावी यासाठी गेल्या काही दिवसापासून दोन गटांमध्ये पत्रव्यवहार सुरु होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक घेण्यास परवानगी दिल्याने, अध्यक्ष कदम व चिटणीस प्रा.डॉ.जैन यांनी एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक विश्वस्त व आठ कार्यकारी मंडळ सदस्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

दि.२८ नोव्हेंबरला मतदार यादीवर हरकती घेणे, १ डिसेंबरला हरकतींवर कार्यकारी मंडळाची मंजुरी घेणे, १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे, २५ डिसेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, १ ते ४ जानेवारी उमेदवारी अर्ज स्वीकारणे, ५ जानेवारीला अर्जांची छाननी, ८ जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेणे, २३ जानेवारी रोजी मतदान तर २४ जानेवारी रोजी मतमोजणी शेवटी ३० जानेवारीला निकाल जाहीर हाेईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज