समितीवर हेमाताई अमळकर, मनीषा खडके यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात महिला शक्ती केंद्र समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीत महिला विषयक करणाऱ्या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठानच्या संचालिका व सेवावस्ती विभागाच्या प्रकल्प सहप्रमुख मनीषा खडके यांची तर बालकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात बालहक्क व प्रतिपालकत्व समितीवर विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहकोषाध्यक्षा हेमा अमळकर यांची निवड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली. जिल्हाधिकारी या दोन्ही समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असून, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदसिद्ध सचिव असतील.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज