fbpx

नाथाभाऊ लवकरच नामदार म्हणून परतणार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज ।  २३ ऑगस्ट २०२१। माजी मंत्री एकनाथराव खडसे लवकरच जिल्ह्यात आमदार नव्हे तर नामदार म्हणून परततील असे प्रतिपादन राष्ट्रवादी  जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी केले. झाड माझ्या नाथाभाऊंचे हा उपक्रम कौतुकास्पद असून हा निंभोरा पॅटर्न जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रस तर्फे राबविण्यात येणार आहे.

कृषी विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा दि.२ सप्टेंबर रोजी त्यांच्या ६९ व्या वाढदिवस निमित्त निंभोरा परीसरातील राष्ट्रवादी प्रेमींनी २ ते ९ सप्टेंबर दरम्यान वाढदिवस सप्ताहाचे नियोजन जाहीर केले. त्याप्रसंगी रवींद्र पाटील बोलत होते. जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रम, पक्षसंघटन, शाखा उद्घाटन, सदस्य नोंदणी अभियान, जनहितार्थ योजनांसाठी शिबीर, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, महिलांच्या बचत गटांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष सोपान पाटील, रमेश पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, राजेश वानखेडे, प्रकाश पाटील, प्रल्हाद बोंडे, नीलकंठ चौधरी, दिपक पाटील, शेख मेहमूद, गुणवंत नीळ, दिगंबर चौधरी, सचिन महाले आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज