हेमा मालिनीवरून गुलाबराव पाटील-एकनाथराव खडसेंची जुगलबंदी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांना डिवचलं आहे. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारसभेत केलं होतं. दरम्यान, या टीकेला आता एकनाथराव खडसे जोरदार प्रत्त्युत्तर दिल आहे. हेमा मालिनी त्यांना का आठवली हे माझ्या लक्षातं आलं नाही. ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील. मी त्याची फार दखल घेत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

जिल्ह्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. यामध्ये राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) एकमेकांच्या विरोधात लढत आहे. सध्या प्रचार सभांनी जोर धरला असून एकमेकांवर टीका-टिप्पण्या केल्या जात आहेत. याच एक भाग म्ह्णून बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारसभेत गुलाबराव पाटील यांनी मतदार संघांच्या विकास कामावरून एकनाथराव खडसे यांना डिवचलं आहे.

माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केलाय.

गुलाबराव पाटलांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना खडसे म्हणाले  नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आहेत. स्वाभाविकपणे निवडणुकीच्या ओघात केलेलं ते भाष्य आहे. गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंनी तीस वर्षात काय केलं हे माहिती आहे. जिल्ह्यातील लोकांना नाथाभाऊनं काय केलं हे माहिती आहे. ज्या वेळेस तीस वर्ष एखाद्या लोकप्रतिनिधीला लोक निवडून देतात त्यावेळी त्यानं काम केल्याशिवाय देत नाहीत. मला राजकारणात चाळीस वर्ष झाली आहेत. मी चाळीस वर्षात एकही निवडणूक हारलेलो नाही. जळगावच्या विकासकामामध्ये सर्वाधिक काम मी केलंय, असं एकनाथ खडसे म्हणाले.

हेमा मालिनी त्यांना का आठवली हे माझ्या लक्षातं आलं नाही. ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील. मी त्याची फार दखल घेत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -