गिरीश महाजनांच्या उत्तम स्वास्थासाठी एकनाथराव खडसेंनी केली प्रार्थना

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । भाजपचे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आ.महाजनांना टोमणा लगावत एकनाथराव खडसेंनी त्यांच्या उत्तम स्वास्थासाठी प्रार्थना देखील केली आहे.

माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना, गिरीश महाजन मागे ईडीच्या चौकशा लागल्याने नाथाभाऊंना दुसऱ्यांदा कोरोना झाला असे ते म्हणाले होते. मला तर खरोखर कोरोना झाला होता. आताही गिरीश भाऊंना दुसऱ्यांदा कोरोना झालेला आहे. मला वाटते त्यांच्यामागे मोक्का लावण्याची कारवाई सुरु दिसते, त्या भीतीपोटी त्यांना कोरोना झाल्याचा मला संशय आहे, असे खडसे म्हणाले.

गिरीश महाजनांना जरी कोरोना झालेला असला तरी माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. त्यांची समाजाला गरज आहे. त्यांची महाराष्ट्राला गरज आहे म्हणून त्यांचे प्रकृती स्वास्थ उत्तम राहो यासाठी मी प्रार्थना करणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -