fbpx

…म्हणून भाजप खडसेंना अडकवत आहेत ; जयंत पाटलांकडून खडसेंची पाठराखण

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । ईडीच्या चौकशीच्या सामोरे जात असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची पाठराखण करताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने खडसेंना अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथराव खडसे यांना चौकशीसाठी ईडीने समन्स बजावलं आहे. त्यावरून जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ खडसे यांच्यावर ज्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, त्यात अद्याप कोणतेही तथ्य आढळलेले नाही किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली होती, त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. असं असतानाही कुभांड रचून केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत त्यांना राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला. 

mi advt

‘भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिलं गेलं नाही. ओबीसी नेतृत्व असल्यानं त्यांना बाजूला करण्यात आलं. आता त्यांना राष्ट्रवादीत सन्मानानं प्रवेश दिल्यानं चिडून जाऊन भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. खडसेंना चुकीच्या पद्धतीनं अडकवत आहे. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज