fbpx

आता खडसेंनी ती सीडी लावावी ; ‘या’ भाजप नेत्याचे खडसेंना खुले आव्हान

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ । भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी भूखंडप्रकरणी इडीकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आताच्या सत्ताधाऱ्यांनीच सुरु केली होती. त्यामुळे ईडी आता याप्रकरणाचा तपास करत आहे. मुळात ‘कर नाही त्याला डर कशाला’? आता कुणाला काय सीडी लावायचेय ती त्यांनी लावावी, असा टोला अतुल भातखळकर यांनी खडसे यांना लगावला. 

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांना उघडउघड आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांना इशारा दिला होता. तुम्ही ईडी लावलीत तर मी सीडी लावेन, असे सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत अतुल भातखळकर यांनी एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले.

दरम्यान, ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. दुसरीकडे, “भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे” असं मत अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे खडसेंचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt