⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | कुटुंबियांनी औक्षण केल्यावर एकनाथराव खडसे अर्ज भरण्यास रवाना

कुटुंबियांनी औक्षण केल्यावर एकनाथराव खडसे अर्ज भरण्यास रवाना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । येत्या 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात माजी मंत्री जेष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) आणि रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना उमेदवारी देण्यात आली.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने एकनाथ खडसे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पुर्वी खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे-खेवलकर यांनी एकनाथराव खडसे यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

राज्यसभा निवडणुकीसोबतच विधान परिषद निवडणुकीची देखील रणधुमाळी सुरू आहे. उद्या दि.१० रोजी राज्यसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून दि.२० रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही आपले पत्ते उघड करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी एकनाथराव खडसे आण रामराजे निंबाळकर याना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंचे पुनर्वसन होणार आहि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना संधी देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने खडसेंना दिलेला शब्द पाळला असून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.