एकनाथराव खडसेंना संसर्ग, मुंबईत उपचारार्थ दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आठवडाभरापासून रूग्णलयात असून त्यांच्यावर उपाचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे हेदेखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले होते.

गेल्या महिन्यात ईडीसमोर चौकशीला सामोरं जाण्याआधी एकनाथ खडसेंनी एक खळबळजनक आरोप केला होता. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली होती. तसंच भाजप सोडल्यापासून माझ्यामागे चौकशी लावली जात आहे. या चौकशीवर मला संशय येत आहे. संशय येण्यामागे पण एक कारण आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावमधील काही Whatsapp ग्रुपवर कुछ तो होनेवाला है, असा मॅसेज फिरत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा हा प्रयत्न असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -