बारा बलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्षपदी एकनाथराव बोरसे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । महाराष्ट्र बारा बलुतेदार-अलुतेदार महासंघातील विविध ओबीसीचे प्रलंबित प्रश्न व त्यांच्या न्याय हक्कासाठी सर्व समाजाचे संघटन मजबूत होणेसाठी उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यध्यक्षपदी एकनाथराव बोरसे यांची नियुक्ती महासंघ प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी नुकतीच जाहीर केली आहे.

नासिक येथील पंचवटी पेठ रोड येथील कुमावत नगरात बारा बलुतेदार महासंघ बैठकीत बारा बलुतेदार महासंघ प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी बारा बलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्षपदी एकनाथराव बोरसे यांना नियुक्ती पत्र देवुन जाहिर केले.

याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मुकुंद मेटकर, कुमावत समाज प्रदेशाध्यक्ष साहेबराव कुमावत, परिट (धोबी) प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, बारा बलुतेदार महासंघ प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी कारवाल आदि उपस्थित होते. नियुक्ती पत्रात म्हटले आहे कि आपल्या सामाजिक कार्याची संघटनात्मक कौशल्याची प्रती असलेली दृढ विश्वासाची दखल घेऊन बारा बलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.

आपण घटना नियम, नियमावली अनुसरुन कार्य करावे. आपण आपला जास्तीत जास्त वेळ संघटनेला देऊन संघटना बळकट होण्यासाठी जोमाने काम करावे तसेच १२ बलुतेदार १८ अलुतेदारांना शोभत घेऊन संघटना मजबूत झाली की, शासन दरबारी बलुतेदारांचा दबाव गट निर्माण करून ओबीसी समाजांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोर्चे, धरणे आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे.

बारा बलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्षपदी एकनाथराव बोरसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, धुळे परिट (धोबी) सेवा मंडळ जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे, माळी समाजाचे नेते किशोर माळी वाघाडी, बारी समाज तालुकाध्यक्ष संजय आसापुरे, चौधरी समाज क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष सुनिल चौधरी, भोई समाज युवक संघटनाचे पदाधिकारी राधेश्याम भोई, रविंद्र भोई, सोनार समाजाचे रविंद्र सोनार, राजुलाल मारवाडी, भावसार समाजाचे कार्यकर्ते मनोज भावसार, लोहार समाजाचे सक्रीय कार्यकर्ते बापू लोहार, शिंपी समाज युवक उपाध्यक्ष अविनाश शिंपी आदिंनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -