fbpx

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पाचोरा व भडगाव तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनाच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. 

त्यानंतर जळगाव येथे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या घरी भेट देणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी दिली. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रथमच नगरविकास मंत्री शिंदे जिल्ह्यात येत आहेत. 

mi advt

पाचोरा नगरपालिका क्षेत्रातील विकास कामांचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर ते जळगाव येथे येणार आहेत. या वेळी प्रा. सोनवणे यांच्या घरी भेट दिल्यानंतर ते महापालिकेत भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज