fbpx

मुक्ताईनगरमधील सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले….

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । मुक्ताईनगरमधील भाजपाच्या सहा नगरसेवकांनी काल बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य केलं असून आणखी चार नगसेवक प्रवेश करणार असल्याचा शिवसेनेचा दावा फेटाळला आहे.

भाजपाचे आणखी चार नगरसेवक शिवसेनेत येणार आहेत, असं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. एकनाथ खडसे यांनी मात्र दावा फेटाळला आहे. तसंच सहा नाही तर पाच नगरसेवकांनी प्रवेश केल्याचं ते म्हणाले आहेत. “जे नगरसेवक गेलेले दिसत आहेत त्यापैकी फक्त चार नगसेवक चित्रात दिसत आहेत. अपक्षासहित एकूण पाच नगरसेवक गेल्याचं दिसत असून त्यातील तीन नगरसेवकांविरोधात अतीक्रमण केलं, बनावट दाखला जोडला या कारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु आहे. एक नगरसेविका चार मुलं असल्याने आधीच अपात्र ठरली आहे,” असे एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

 गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया –

“मुक्ताईनगरमधील भाजपाचे नगरसेवक एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीत जातील असंच सर्वांना वाटत होतं. पण त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. आम्हाला त्याचा आनंद आहे. यानिमित्ताने भाजपचे नगरसेवक महाविकास आघाडीत आले याचा एकनाथ खडसे यांनाही आनंदच होईल,” अशी आशा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज