एकनाथ खडसे बाळासाहेब थोरात यांच्यात रोहित पवारांच्या उपस्थितीत चर्चा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । माजी मंत्री एकनाथराव खडसे सध्या फार सक्रिय झाले असून अनेक नेत्यांच्या ते सध्या भेटी घेत आहेत. आज त्यांनी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी आमदार रोहित पवार यांची देखील उपस्थिती होती.

माजी मंत्री एकनाथराव खडसे हे बर्‍याच दिवसांपासून मुंबईत असून त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आहेत. तर सुप्रीया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी खडसे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात बीएचआर घोटाळ्यावरून होत असलेल्या कारवाया आणि एकनाथ खडसेंच्या भेटी यावरून जोरदार राजकीय चर्चा सुरु आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar