fbpx

खडसेंची अचानक प्रकृती खालावली, चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार का?

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना ईडीने समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी आज गुरुवारी सकाळी ११ वाजता बोलावले आहे. त्यापूर्वी आज खडसे पत्रकार परिषद घेणार होते. 

मात्र, एकनाथराव खडसे यांची अचानक प्रकृती खालावल्यानं आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे. तसंच, ते आज चौकशीसाठी हजर राहणार का?, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथराव खडसे अडचणीत सापडलेले आहेत. जावयाच्या अटकेनंतर त्यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. आजच्या पत्रकार परिषदेत खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं आज होणारी पत्रकार परिषद रद्द करावी लागली आहे.

दरम्यान, आता एकनाथराव खडसे चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार का?, की ईडीकडे चौकशीसाठी वेळ वाढवून मागणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे. ज्या प्रकारे अनिल देशमुख यांनी ईडीकडून काही कागदपत्र मागवून ईडीकडून वेळ मागून घेतली होती, त्याच धर्तीवर एकनाथ खडसे हे देखील ईडीकडे वेळ मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज