fbpx

हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे

खडसे यांचा फिल्मी स्टाईलने विरोधकांना इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ ।  राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. जळगावात आयोजित एका कार्यक्रमात खडसे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, अशा शायराना अंदाजात एकनाथ खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला.

गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे आणि भाजप नेते, माजी मंत्री गिरीश महाजनयांच्यातील शाब्दीक युद्ध रंगले आहे. दोन्ही नेते एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. काल खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. आता शायराना अंदाजात त्यांनी निशाणा साधला.

हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, काय राहिलं आता आयुष्यात सत्तराव्या वर्षी. कशासाठी? कशासाठी हे लोकं बदनामी करत आहेत, असा सवाल खडसे यांनी केला.

ईडीला घाबरत नाही
यावेळी त्यांनी ईडीचा विषय पुन्हा एकदा छेडला. आता ईडीचा विषय संपला आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. आता प्रकरण कोर्टात आहे. मी फक्त कोर्टाला घाबरतो, असं त्यांनी सांगितलं. काहीही एक संबंध नसताना माझ्या जावयाला यांनी आत टाकले. आज मी ज्या पक्षांमध्ये आहे तो पक्ष राष्ट्रवादी माझ्या पाठीमागे खंबीर पणे उभा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल

एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाव न घेता हल्लाबोल केला आहे. माझा छळ करण्यात आला. मला एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरुन बदनाम करण्यात आलं. तो व्यक्ती कोण आहे. माहित आहे का? गुगलवर जाऊन टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण असं विचारा, असं म्हणत खडसेंनी नाव न घेता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज