जि.प.तील असमान निधी वाटपाबाबत खडसेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२१ । जळगाव जिल्हा परिषदेतील असमान निधी वाटपाबाबत राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंकडे तक्रार केली होती. याबाबत आता खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून तक्रार केली आहे.

काय आहे प्रकार?
जळगाव जिल्हा परिषदेतील पहिल्या फळीतील 10 ते 12 सर्वपक्षीय सदस्यांनी आपसात तब्बल 25 कोटी रूपयांचे कामे वाटून घेतली आहेत. अन्य सदस्यांच्या गटामध्ये किरकोळ कामे देण्यात आली आहेत. काही सदस्यांनी 1 कोटी रूपयांची कामे घेतली तर काही सदस्यांना केवळ 2 ते 3 लाखांचीच कामे मिळाली आहेत. असमान निधी वाटपाचे सूत्र गेल्या पाच वर्षापासून सुरू असून त्यात सर्वच पक्षांचे गटनेते आघाडीवर आहेत.

यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी खडसेंसोबत मुंबई गाठून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार , ग्रामविकास विभागाच्या सचिवांची भेट घेवून हा प्रकार लक्षात आणून दिला. दरम्यान, याप्रकरणाची आता तातडीने चौकशी केली जाणार आहे.

शुक्रवारी चौकशीचे पत्र निघणार यासंदर्भात तातडीने ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेची कामे आहे त्यात टप्प्यात थांबविली जाणार आहेत. या कामांची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी ग्रामविकास विभागाच्या सचिवांकडून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र काढले जाणार असल्याची माहिती प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी दिली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -