राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी एजाज मलिक यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश चिटणीसपदी एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात त्यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले.

जळगाव येथील एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या उपस्थितीत त्याना हे नियुक्ती पत्र देण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज