‘या’ आठ रेल्वेगाड्यांचे भाडे ‘इतक्या’ रुपयाने कमी हाेणार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । रेल्वे मंत्रालयाकडून काेराेनाच्या काळात विशेष गाड्यांचा दर्जा देण्यात आलेल्या, आठ रेल्वे गाड्या पूर्वीप्रमाणेच सर्वसामान्य म्हणून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलम आहे. त्यामुळे या गाड्यांचा दर्जा कमी हाेऊन तिकिटाची रक्कम ५० ते १०० रुपये कमी हाेणार असल्याने, दिलासा मिळेल.

यात लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया द्वि-साप्ताहिक गाडी आता ट्रेन क्रमांक १२८११ म्हणून धावणार आहे. ०२८१२ हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक ट्रेन आता १२८१२ या क्रमांकाने धावणार आहे. ०२८१७ पुणे -संत्रागाछी साप्ताहिक गाडी आता ही २०८२१ या क्रमांकाने चालणार अाहे. ०२८१८ संत्रागाछी -पुणे साप्ताहिक गाडी आता २०८२२ या क्रमांकाने चालणार आहे. ०२५९६ साईनगर शिर्डी -हावडा साप्ताहिक आता २२८९३ म्हणून धावणार आहे.

०२५९४ हावडा- साईनगर शिर्डी साप्ताहिक गाडी आता २२८९४ या क्रमांकाने चालणार आहे. ०२०९५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हावडा ही आठवड्यातून चार दिवस धावणारी ट्रेन आता १२२६१ म्हणून धावणार आहे. ०२०९६ हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आठवड्यातून चार दिवस चालणारी ट्रेन आता १२२६२ म्हणून धावेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -