यावल येथील आठ विद्यार्थी आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेत विजयी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । यावल महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांनी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर येथे आयोजित आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेत विजय प्राप्त केला आहे. पवन शांताराम अडकमोल (टी.वाय.बी.ए), हासिम फिरोज खाटीक(एफ.वाय.बी.ए), कुंदन अजय पारधे (टी.वाय.बी.ए), संकेत दिगंबर तायडे (एफ.वाय.बी ए ), सुमित सूनील भालेराव (एफ.वाय.बी.एस.सी), रोहित अनिल जंजाळे(टी.वाय.बी.ए), आकाश किशन सुरवाडे (टी.वाय.बी .कॉम) असे विजय संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे, त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाज बांधवांच्या वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

सविस्तर असे की, यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील आठ विद्यार्थी पवन शांताराम अडकमोल (टी वाय बी ए), हासिम फिरोज खाटीक(एफ वाय बी ए), कुंदन अजय पारधे (टी वाय बी ए), संकेत दिगंबर तायडे (एफ वाय बी ए ), सुमित सूनील भालेराव (एफ वाय बी एस सी), रोहित अनिल जंजाळे(टी वाय बी ए), आकाश किशन सुरवाडे (टी वाय बी कॉम) यांनी यावल तालुक्यातील धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर येथे आयोजित आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेत यावल महाविद्यालयाच्या या मुलांनी आपल्या आपल्या गटात विजय प्राप्त केला.
सोमवार, दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी सुरू होत असलेल्या स्पर्धेसाठी यावल महाविद्यालय व एस. पी. डी. एम. महाविद्यालय या विद्यार्थ्यांची शिरपूर येथे विद्यापीठस्तरीय विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे, उपप्राचार्य एम.डी.खैरनार, प्रा.ए.पी.पाटील, प्रा.संजय पाटिल, प्रा.एस.एम.वानखडे, डॉ.पी.व्ही पावरा, बॉक्सिंग कोच पंकज तडवी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाज बांधवांच्या वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -