दीपनगरजवळ आयशर-पिकअपचा अपघात; तीन जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगर जवळील टोल नाक्यावरील पूलाच्या अलीकडे आयशर आणि पिकअप यांच्यात समोरा-समोर झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडली. जखमींना तत्काळ हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातामुळे वाहतूक काही वेळ ठप्प

बुधवारी दुपारी दीपनगर येथील पुलाच्या अलिकडे वरणगावकडून भुसावळकडे येणारी पिकअप व्हॅन (एम.एच. 19 बी.एम.1626) आणि वरणगावकडे जाणारी आयशर गाडी (एमएच 39 एडी 7770) यांच्यात समोरा-समोर अपघात झाला. अपघात इतका जोरात होता की, दोन्ही गाड्या एकमेकांमध्ये अडकल्या होत्या. पिकअप व्हॅनला आयशर गाडीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन आणावे लागले होते, त्या मशीनच्या सहाय्याने गाड्या एकमेकांपासून दूर करण्यात आल्यात. या अपघातात दोन्ही वाहनातील तीन जण जखमी झाले असून, त्यांना जमलेल्या नागरीकांनी गाडीच्या बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी हॉस्पीटलला हलविले.

तालुका पोलिसांची वेळीच धाव

अपघाताची माहिती मिळतात तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, निरीक्षक प्रकाश वानखेडे आणि पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गाड्या एकमेकांपासून दूर करीत रस्ता वाहतुकीला मोकळा केला. जखमींना कुठल्या हॉस्पीटलला अ‍ॅडमीट केले आहे, याची माहिती घेऊन पोलिस जखमींचे जबाब घेणार असल्याचे निरीक्षक शेंडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज