fbpx

उभ्या आयशरवर मागून आयशर धडकली, चालक जागीच ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यातील अपघातांची मालिका थांबतच नसून दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहे. भुसावळ-वरणगाव महामार्गावर कुशल ढाब्याजवळ उभ्या असलेल्या आयशर गाडीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आयशर वाहनाने धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजता घडला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

वरणगावजवळ भुसावळ रस्त्यावर कुशल ढाब्यासमोर बुधवारी रात्री आयशर क्रमांक एम.एच.४० बी.जी.७६१९ मागील टायर फुटल्याने उभी होती. बंद असलेले वाहन इतरांना दिसावे म्हणून चालकाने पार्कींग इंडिकेटर लाईट व इतर झाडाच्या फांद्या लावल्या होत्या. ९ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी आयशर क्रमांक जी.जे.१५ ए.टी.४८८३ ही मागील बाजूने धडकली. अपघात इतका जोरदार होता की, अपघातात आयशर चालक अमोल श्रावणजी वाकोडे (कोल्ही एक, ता.बाभुळगाव, जि.यवतमाळ) यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही आयशर वाहनांचे नुकसान झाले. आयशर चालक आवेद खान अब्दुल मजीद खान (45, पोलिस लाईन टाकळी, काटेल रोड, नागपूर) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज