fbpx

सर्वसामान्यांसाठी गुडन्यूज ; खाद्य तेलाच्या किंमती आणखी स्वस्त होणार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । मागील अनेक महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आक्रमक पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने पुन्हा एकदा आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना काल रात्री जारी केली आहे. त्यानुसार क्रूड पाम तेलावरील आयात शुल्क १० टक्के कमी करण्यात आले असून ते ३०.२५ टक्के राहील. रिफाइंड पाम तेलाचे शुल्क ४१.२५ टक्के केले आहे. आज बुधवार ३० जून २०२१ पासून सुधारित शुल्क लागू झाले असल्याचे सरकारने म्हटलं आहे. ही शुल्क कपात ३० जून ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीपुरता राहणार आहे.

सरकारने यापूर्वी १७ जून २०२१ रोजी पाम तेलावरील आयात शुल्कात प्रती टन ८००० रुपयांची (११२ डॉलर) कपात केली होती. ज्यात क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क ८६ डॉलर प्रती टनामागे कमी करण्यात आले होते. या कपातीनंतर एक टन क्रूड पाम तेलावर ११३६ डॉलर इतके शुल्क झाले. त्याशिवाय क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन ३७ डॉलरची कपात करुन ते १४१५ डॉलर केले आहे. पाम तेलावरील आयात शुल्क ११२ डॉलरने कमी होऊन ११४८ डॉलर प्रती टन झाले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज