fbpx

ऐन सणासुदीत खाद्य तेल महागले ; वाचा नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । गेल्या काही महिन्यांत खाद्य तेलांच्या किमती प्रचंढ वाढल्या आहे. तेलाच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. सणासुदीत तेलाच्या किंमती कमी होणार असे वाटतं असताना मात्र, ऐन सणासुदीत खाद्य तेल महागले आहे. जळगावमध्ये गेल्या ८ दिवसात खाद्य तेल ५ ते ६ रुपयाने महागले आहे. सरकारनं पावले उचलूनही तेलाच्या किमती कमी होत नाहीत.

कोरोनाचा प्रादुर्भाव जसा वाढला तसे तेलाचे भावही सातत्याने वाढत होते. कोरोनाची दुसरी लाट साधारणत: जानेवारी ते फुब्रुवारीच्या दरम्यान आली. त्या कालावधीत शेंगदाणा तेल २० ते २५ तर सोयाबीन तेलाचे भाव ४० ते ५० रुपयांनी वाढले. खाद्य तेलाचे भाव १६५ ते १७० रुपयांपर्यंत गेले होते. तर शेंगदाणा तेल देखील १९० ते २०० रुपयापर्यंत गेले होते.

mi advt

जे लोक १० ते १५ किलोची पॅकिंग असलेले तेलाचे डबे घ्यायचे ते 2 ते 5 किलो तेल किराणा दुकानातून खरेदी करायचे. कधी नव्हे, इतके खाद्यतेल महाग झाल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. सणासुदीत तेलाचे भाव कमी होणार असे वाटत असताना त्यात मात्र गेल्या आठ दिवसात खाद्य तेलांच्या किंमती ५ ते ६ रुपयाने वधारले आहे.

सध्या जळगावात सोयाबीन तेलाचे भाव १३९ रुपये प्रति किलो इतके आहे. आठ दिवसापूर्वी सोयाबीनचे दर १३५ रुपये इतके होते. शेंगदाणा तेल १६५ रुपये किलो इतके आहे. तर पाम तेलाची किंमत १२५ रुपये इतकी आहे.

दरम्यान, तेलाच्या वाढत्या किमतीमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कर कपातीचा निर्णय घेतला होता. त्यात गेल्या दीड महिन्यात तेलाचे भाव २० ते २५ रुपयाची घसरण झालेली दिसतेय. सध्याचे खाद्य तेलाचे भाव अजूनही सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून टाकणारे आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज