जळगाव जिल्हा बँकेला ईडीची नोटीस

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सध्या खडसे कुटुंबासह महाआघाडीच्या नेत्यांच्या मागे लागला आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबाची ईडी चौकशी संपत नाही तोच त्यांची कन्या अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीची चौकशीसाठी नोटीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडी चौकशी झाली असून त्यांचे जावई गिरीश चौधरी हे ५ जुलैपासून ईडीच्या ताब्यात आहेत. खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील ईडीची नोटीस आली आहे. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे या अध्यक्षा असणार्‍या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठविल्याची माहिती आता समोर आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यातच आता ईडीची नोटीस आल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -