fbpx

Big Breaking : खडसेंसह जावयाची मालमत्ता ईडीने केली जप्त

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का बसलाय. ईडीने गुरुवारी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी तर शुक्रवारी खडसेंची मालमत्ता जप्त केली आहे. पुणे भोसरी एमआयडीसी गैर व्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. एएनआयने आणि काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, ईडीने फेमा, 1999 च्या तरतुदींनुसार पीसी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (NBFC) च्या पेमेंट गेटवेसह बँक खाती आणि व्हर्च्युअल खात्यांमध्ये असलेले १०६.९३ कोटी रुपये जप्त केले आहेत. बुधवारी ही कारवाई केल्याचे समजते.

दुसरीकडे याच प्रकरणात राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीची खडसे यांच्यावर कारवाई करत ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. काही वृत्तवाहिन्यांनी याबाबत वृत्त दिले आहे.

ईडी’च्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ‘ईडी’चा तपास सुरू केला होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज