सुवर्णसंधी.. ‘या’ सरकारी कंपनीत 150 जागा रिक्त, त्वरित अर्ज करा

बातमी शेअर करा

ECIL Recruitment 2022 : इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने पदवीधर / तंत्रज्ञ शिकाऊ पदाच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. नोटीसनुसार, अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ECIL मध्ये शिकाऊ उमेदवारांच्या 150 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करायचे आहेत. अपरेंटिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2022 आहे.

रिक्त पदांचा तपशील

१. अभियांत्रिकी पदवीधर – १४५
२. डिप्लोमा किंवा तंत्रज्ञ शिकाऊ – ५

शैक्षणिक पात्रता

ग्रॅज्युएट अप्रेंटिस- ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिससाठी, उमेदवाराने इंजिनीअरिंगच्या संबंधित विषयात BE/B.Tech असणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञ शिकाऊ – तंत्रज्ञ शिकाऊ भरतीसाठी, उमेदवारांनी अभियांत्रिकीच्या संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा केलेला असावा.

वयो मर्यादा :

ECIL मध्ये शिकाऊ पदाच्या भरतीसाठी उमेदवारांचे वय कमाल २५ वर्षे असावे. 31 जानेवारी 2022 पासून वयाची गणना केली जाईल. एससी आणि एसटीला वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळेल. ओबीसींना वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट, दिव्यांगांना 10 वर्षांची सूट दिली जाईल.

अर्ज कसा करायचा :

ECIL मध्ये शिकाऊ भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम NATS पोर्टल www.mhrdnats.gov.in वर नावनोंदणी करावी लागेल. त्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -