केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते खा. उन्मेश पाटलांचा सत्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । उत्तर महाराष्ट्रात बांबू लागवड संवर्धन, प्रसार, प्रचारासाठी माजी आमदार पाशा पटेल यांच्या सोबत विवीध ठिकाणी कार्यशाळा आयोजित करुन शेतकऱ्यांना शेतीस नवा समृद्ध पर्याय देण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आज खा. उन्मेश पाटील यांचा सत्कार केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

देशातील पहिले खाजगी सार्वजनिक भागीदारीतून निर्मित फिनिक्स आयशर वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्था लोदगा ता. औसा जि. लातूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या संस्थेचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला.

यावेळी माजी आमदार पाशा पटेल यांनी आपली भुमिका मांडत राज्यभर जनजागृती करताना खासदार उन्मेश पाटील यांनी गल्ली ते दिल्ली वेळोवेळी मोलाची मदत केली. याबद्दल केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार, आजी माजी आमदार मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज