एरंडोलच्या रस्त्यांवर २४ तास धावणार ई-रिक्षा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियान प्रेरित होऊन एरंडोल शहरातील नागरिकांनी प्रवासी ई रिक्षा जळगाव जिल्ह्यात प्रथम विकत घेतली. एरंडोल शहरातील दिपक यशवंत टोडकर रा.एरंडोल यांनी महिंद्रा कंपनी ने बनविलेली trio model ही ई रिक्षा विकत घेतली.एकूण खर्च २.४० लक्ष सर्वसाधारण मायलेज १३० कि.मी. प्रती फुल चार्जिंग बॅटरी नुसार.

चार्जिंग वेळ ३ तास २० मि.एका वेळी फुल चार्जिंग साठी ५ युनिट चा वापर होतो.त्यासाठी खर्च ५० रू.अत्यंत माफक दरात. Warranty कालावधी 3 वर्ष सर्व maintainace company मार्फत.कुठलाही गेयर नाही.ऑटो स्टार्ट सिस्टीम.महिलांसाठी सुध्दा सोयीस्कर.प्रवासी क्षमता 3+1.टॉप स्पीड 55km/hr. battery प्रकार lithium ion battery. एरंडोल शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी ई रिक्षा चा वापर करावा व त्यास प्रोत्साहन द्यावे असे आवाहन नगर पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी केले.

तसेच शहरातील कुठल्याही नागरिकांना २४ तास कधीही सेवेची गरज पडल्यास दीपक टोडकर यांनी आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन नागरिकांना केले संपर्क क्र 9730595951. नगर पालिका च्या वतीने त्यांचा पर्यावरण दुत म्हणून सन्मान करण्यात आला.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -