वेल्हाळे येथे साडेतीन एकर ऊस शॉर्टसर्किटने खाक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे शिवारातील गट नंबर ३९२ मधील साडेतीन एकर तोडणी योग्य ऊस शॉर्टसर्किटमुळे आग लागून खाक झाला. यात शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी पावणेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली.

भुसावळ शहरातील खळवाडी भागातील माजी सैनिक प्रकाश तापीराम नेहेते यांचे वेल्हाळे शिवारात गट नंबर ३९२ हे पाच एकर क्षेत्र आहे. त्यापैकी त्यांनी साडेतीन एकरवर ऊस लागवड केली होती. १२ महिन्यांचे पीक आता तोडणीवर आले असतानाच शुक्रवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास वीज तारांवर शॉर्टसर्किट होऊन ऊसाने पेट घेतला. अवघ्या पाऊण तासांत संपूर्ण ऊस जळून खाक झाला. यात दीड लाखांचा ऊस व ५० हजारांचा पीव्हीसी पाइप असे एकूण २ लाखांचे नुकसान झाले.
या घटनेत शेताजवळील ट्रान्स्फॉर्मरला आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धनंजय धांडे, किन्ही येथील सहाय्यक अभियंता कविता सोनवणे यांनी भेट देवून पाहणी केली आणि नुकसानीचा पंचनामा केला.

हे दखल वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -