भरदिवसा तरुणीच्या हातातील माेबाइल हिसकावत काढला पळ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोन भामट्यांनी तरुणीच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. ३ रोजी सकाळी ९.१५ वाजता ही घटना घडली.

माधुरी धोंडू मिस्तरी (वय २५, रा. रेणुकानगर, वरणगाव, ता. भुसावळ) या तरुणीचा मोबाइल हिसकावला गेला आहे. माधुरी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असून जळगाव शहरातील प्रतापनगर भागात राहते. ३ जानेवारी रोजी ती नूतन मराठा महाविद्यालयाजवळून जात असताना मोबाइलवर बोलत होती. या वेळी तीच्या पाठीमागून दोन भामटे दुचाकीने आले. त्यातील एकाने माधुरीच्या हातातील मोबाइल हिसकावला. यांनतर भरधाव वेगात दोघे पळून गेले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -