fbpx

भरधाव डंपची ॲपेरिक्षाला जोरदार धडक ; रिक्षाचालक गंभीर जखमी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२१ । वाळूने भरलेल्या भरधाव डंपने ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना यावल-चोपडा मार्गावर असलेल्या साईकृपा ढाब्याजवळ रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेनंतर डंपरचालक डंपर सोडून फरार झाला आहे.

याबाबत असे की,  यावल-चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपाच्या पुढे साईकृपा ढाब्याच्या काही अंतरावर रविवार ६ जुन रोजी रात्री ११.२० वाजेच्या सुमारास चोपड्याकडुन भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी डंपरने वाहनाने यावलहून किनगावकडे जाणाऱ्या अॅपेरिक्शा क्रमांक (एमएच १९ एई ६४९३) याला जोरदार धडक दिली. या अपघातात ॲपेरिक्षा चालक गंभीर जखमी झाला.

यावल पोलीस स्टेशनचे पो.नि. सुधीर पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस पाठविले. जेसीबी यंत्रणेच्या सहाय्याने अपघातास कारणीभुत डंपरला बाहेर काढले. याबाबत घटनेतील अपघातास कारणीभुत डंपर वाहनचालक हा डंपर सोडून फरार झाला आहे. रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी जळगावात हलविण्यात आले आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज