fbpx

बांभोरीजवळ रिक्षा उलटली ; चालक ठार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । बांभोरी गावाजवळील एसएसीबीटी महाविद्यालयाजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. सतिष सुरेश महाजन (वय-३५ रा. वैष्णवी पार्क, अहुजा नगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, सतिष  महाजन हे अहूजा नगरमध्ये वास्तव्यास आहे. ते रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. दरम्यान, सतीश महाजन हे मंगळवार रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पाळधी येथे प्रवाश्यांना सोडून अहूजा नगर येथे घरी परतत असतांना बांभोरी गावाजवळील एसएसीबीटी महाविद्यालयाजवळ रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पटली झाली. त्यात रिक्षा चालक सतिष महाजन हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमोपचार केले असता रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. 

त्यांच्या पश्चात आई रूख्माबाई, वडीत सुरेश पंढरीनाथ महाजन, भाऊ किरण, रणजित आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला.  याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज