दूधात गूळ टाकून पिल्याने थंडीच्या दिवसात होतात ‘हे’ फायदे

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । दूध आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर ठरत असते दुधामध्ये कॅल्शिअम सह अनेक पोषक घटक असतात आणि हेच पोषक घटक व्यक्तीच्या शरीरासाठी फायदेशीर ठरत असतात. नुकतीच हिवाळ्याला सुरवात झाली असून हिवाळ्यात देखील दुधामध्ये एक पदार्थ मिसळून पिल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तर कोणता आहे तो पदार्थ आपण जाणून घेऊ.

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी व्यतिरिक्त, कॅल्शियम, प्रथिने आणि लॅक्टिक ऍसिड दुधात आढळतात, तर गुळात सुक्रोज, ग्लुकोज, लोह आणि अनेक खनिजे आढळतात. म्हणून दुधात गूळ मिसळून पिल्याने अनेक फायदे होत असतात.

दूध-गुळ : गूळ मिसळून दूध प्यायल्याने रक्त शुद्ध होते. शिवाय, यामुळे शरीरही निरोगी राहते. सोबतच लठ्ठपणाने अनेक लोक त्रस्त असतात. लठ्ठपणासाठी पुढील उपाय फायदेशीर ठरू शकतो. दुधात साखर मिसळून प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो, तर दुधात गूळ मिसळून प्यायल्याने वजन कमी होते.

गुळ-लिंबू : लिंबूसोबत गुळाचे सेवन केल्यास ते नैसर्गिक फॅट कटर ठरू शकते, गरम दूध आणि त्यात गुळ मिसळून प्यायल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर राहतात. तुमची पचनशक्तीही चांगली असते. पीरियड्समध्ये आराम मिळतो- पीरियड्सच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी महिला कोमट दुधात गूळ मिसळून पिऊ शकतात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज