डॉ.वसीम शाह यांचा ‘खान्देश गौरव अवॉर्ड’ने सन्मान

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत डॉ.वसीम शाह यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्यावतीने ‘खान्देश गौरव अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

रविवार दि.३१ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, खासदार उन्मेष पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉ.नितीन पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते तुषार वाघुळदे, डॉ.राकेश झोपे, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, डॉ. हर्षल बोरोले, युनानी अध्यक्ष डॉ. मोहम्मद बेग, होमिओपॅथी उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र पडोळ, होमिओपॅथी महिला अध्यक्ष डॉ. आशा भोसले,
एक्युपंक्चर उपाध्यक्ष डॉ. लिना बोरोले, नेचरोपेथी अध्यक्ष डॉ. केदार कुलकर्णी, वीरेंद्र गिरासे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज