माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी कोविड योध्यांसोबत साजरी केली दिवाळी

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । गेल्या दिड वर्षापासून कोरोना आपत्‍तीत दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेत असलेल्या कोविड योध्यांसोबत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी दिवाळी साजरी करून नवीन पायंडा पाडला आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात गेल्या दिड वर्षापासून आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेत कोविड योध्दा म्हणून कार्यरत असलेल्या परिचारीका, डॉक्टर यांच्यासोबत दिवाळी साजरी करत जिल्हयात नवीन पायंडा डॉ उल्हास पाटील यांनी पाडला आहे. यावेळी त्यांच्या सोबत चिरंजिव अनिकेत पाटील, अतिदक्षता, हदयालय सर्जरी आयसीयु, आणि वार्डात दिवाळी असूनही सेवा देणाऱ्या परिचारीका, डॉक्टर आणि वार्डबॉय यांच्यासोबत दिवाळी साजरी करत आनंद लुटला. यावेळी रूग्णांना व कोविड योध्दयांना त्यांनी दिवाळी शुभेच्छा देत माता लक्ष्मीचे पूजनही केले.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात लक्ष्मी पूजन
माजी खासदार डॉ. उल्हास पाटीलय यांच्या हस्ते गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात लक्ष्मी पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य मौसमी लोंढे, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, प्रा. पियुष वाघ यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थीत होते. त्यानंतर डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी येथेही लक्ष्मी पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, प्रशासन अधिकारी राहूल गिरी यांचेसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थीत होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज