इकरा थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सैयद अली सेवानिवृत्त

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । इकरा शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एच.जे.थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सैयद शुजाअत अली यांच्या सेवानिवृत्तिचा कार्यक्रम १४ रोजी संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अ.करीम सालार होते.

कार्यक्रमात उपाध्यक्ष डॉ.इकबाल शाह,सचिव एजाज मलीक,सहसचिव डॉ.मो.ताहेर शेख,सदस्य मजीद मेमन, मो.जफर शेख,शेख गुलामनबी,अ.अजीज सालार,शेख तारिक अनवर,ऊर्दू साहित्यकार नुरुल हुसनैन,डॉ.अजीम, डॉ.नुरुल अमीन,डॉ.खिज़र अहेमद उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मुजम्मील काझी यांनी तर प्रस्तावना प्रा.डॉ.इरफान शेख तसेच आभार प्रदर्शन डॉ.चाँदखान यांनी आभार व्यक्त केले. दरम्यान,डॉ.राजेश भामरे,डॉ.पटेल वाय.ई,नुरुल हुसनैन,डॉ.अज़ीम सर, डॉ.नुरुल अमीन, डॉ.खिज़र अहेमद शर्रर,डॉ.इकबाल शाह,एजाज मलीक यांनी मनोगत व्यक्त केले.

शेवटी प्राचार्य डॉ.सैयद शुजाअत अली यांनी आपल्या मनोगतात इकरा शिक्षण संस्थाच्या पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.अ.करीम सालार म्हटले कि, प्राचार्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या परिवारास वेळ द्यावा तसेच सुज्ञनात्मक लेखनात स्वत:ला गुंतवून ठेवावे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar