fbpx

डॉ. स्वप्नजा गोसावी यांनी पटकावले सुवर्णपदक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । जळगाव येथील रहिवासी डॉ. स्वप्नजा अंबर  गोसावी यांनी दत्ता मेघे इंस्टिट्यूट ऑफ सायन्सेस, वर्धा येथे पार पडलेल्या एम.डी.एस. (ऑर्थोडेंटिस्ट) परीक्षेत विशेष प्रावीण्यसह प्रथम क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाल्या. तसेच त्या सुवर्णपदकाच्या देखील मानकरी ठरल्या आहेत. 

डॉ.  स्वप्नजा ह्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश गोसावी व शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. सुचित्रा गोसावी ह्यांच्या स्नुषा आहेत. डॉ. स्वप्नजा ह्यांना डॉ. सुनिता श्रीवास्तव यांचे अनमोल  मार्गदर्शन  लाभले.

 जिल्हा  सामान्य रुग्णालयातील माजी दंतचिकित्सक डाॅ. प्रवीण जाधव व  ॲड. सुजल भोसले जाधव यांच्य्या सुकन्या आहे. डॉक्टर स्वप्नजा ह्यांचे वैद्यकीय, सामाजिक, विधी, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातून  कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज