fbpx

चोपड्याची कन्या डॉ. मोनिया केदारने पटकाविला ‘मिस इंडिया’चा ताज

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ ।  खान्देशच्या कन्येला दी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट यांच्यावतीने आयोजित हॉटेल कोर्ट यार्ड मेरोट मुंबई एअरपोर्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या ‘मिस इंडिया २०२१/२१ स्पर्धेत चोपडा येथील डॉ. मोनिया केदार हीस राष्ट्रीय पातळीवरचा मानाचा आकर्षक सौंदर्याचा ‘मिस इंडिया ग्लॅमरस इको वॉरियर्स’ प्रथम पुरस्कारचा ताज (क्राऊन) मिळाला आहे. खान्देश कन्या डॉक्टर मोनिया केदार हिने पहिल्यांदाच ‘मिस इंडिया’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

आपला डॉ व्यवसाय सांभाळून संपूर्ण भारतातून टॉप पंधरा मध्ये येण्याचा मानही तिने मिळवला आहे. मिस इंडिया कार्यक्रमात भाग घेऊन उत्तुंग भरारी घेणारी डॉ मोनिया केदार ही चोपडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक मुकुंद केदार व शिक्षिका उषा बाविस्कर (केदार) यांची मुलगी आहे. पुढील महिन्यात दुबई आणि न्यूयॉर्क येथे होणाऱ्या फॅशन वीक कार्यक्रमासाठी डॉ. मोनीयाची वर्णी लागणार आहे. त्यामुळे मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाचे प्रशिक्षक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल आदिती गोवित्रीकर व मिस युनिवर्स २००१  मिस सेलिना जेटली प्रसिद्ध हॉकीपटू युवराज वाल्मिकी उपस्थित होते.

प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यामुळे मिस इंडिया सेलिना जेटली यांनी डॉ. मोनियाचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध टीव्ही. कलाकार आणि मॉडेल सिद्धांत सूर्यवंशी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर्यनमॅन डॉ. स्वरूप पुराणिक आणि मिस इंटरनॅशनल वर्ल्डच्या मानकरी सुपर मॉडेल डॉ. अक्षता प्रभू यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज