जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । जामनेर तालुका देखरेख संघाच्या चेअरमनपदी डॉ.सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जामनेर तालुक्यातील ९४ विकास सोसायटींच्या मालमत्ता असलेल्या जामनेर तालुका प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. यात माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार ईश्वरलाल जैन यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले हाेते. त्यांचे सर्व १३ उमेदवार निवडून आले आहे. या देखरेख संघाच्या चेअरमनपदी भाजपचे डॉ. सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी डी. व्ही. पाटील यांनी बिनविरोध निवड घाेषीत केली.
यावेळी शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष शरद पाटील, जितेंद्र पाटील, अमित देशमुख, ऍड. बोरसे, विलास पाटील, बाबुराव गवळी, नाना पाटील, अशोक भोईटे, कमलाकर पाटील व देखरेख संघाचे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. तर, चेअरमनपदी डाॅ. सुरेश पाटील यांची निवड झाल्यानंतर सभापती चंद्रकांत बाविस्कर यांनी त्यांचा सत्कार केला.
हे देखील वाचा :
- चिंता वाढवणारी बातमी! जळगावातील अनेक भागात भूगर्भातील पाणीपातळी घटली…
- अत्याचारातून तरुणी राहिली गर्भवती, नंतर.. ; जामनेर तालुक्यातील संतापजनक प्रकार
- जळगाव जिल्हा खुनाच्या घटनेनं पुन्हा हादरला ; लेकानेच संपविले जन्मदात्या पित्याला
- मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार ; जामनेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार
- अखेर पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल निलंबित ; नेमकं प्रकरण काय?