fbpx

डॉ. कमलाबाई सोहोनी यांची पुण्यतिथी साजरी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात भारतातील पहिल्या महिला पीएचडी संपादन करणाऱ्या डॉ.कमलाबाई सोहनी यांची पुण्यतिथी निमित्त संशोधन विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

याप्रसंगी सहसंचालक प्रा. सतीश देशपांडे,  प्रभात चौधरी (खिरोदा) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .डॉ.कमलाबाई सोहोनी यांनी 1933 मध्ये भारतीय विज्ञान संस्था बंगळूर येथून विज्ञान विषयात संशोधन करून मोलाचे योगदान दिले. त्या भारतातील पहिल्या महिला संशोधक म्हणून तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला तसेच त्यांनी त्यांच्या सेवाकाळात विविध संशोधन प्रकल्प हाती घेऊन आरोग्यासाठी प्रथिनांची गरज महत्वाचीअसते यावर संशोधन केले. 

प्राचार्य अशोक राणे यांनी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग स्पष्ट केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.नाना गायकवाड ,प्राचार्य यादव सनेर ,प्राचार्य साहेबराव भुकन ,प्राचार्य लता मोरे, डॉ. आरती सपकाळे ,डॉ. शैलजा भंगाळे इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज