fbpx

पाचोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती साजरी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ ।  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती विविध ठिकाणी आज साजरी करण्यात आली. पाचोरा येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला सर्व भीम बांधवानी फुल  माल्यारपण केले. व पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सुद्धा आंबेडर पुतळ्याला अभिवादन केले.

या प्रसंगी जळगांव लाईव्ह ला प्रतिक्रिया देताना आ.पाटील म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या 130 व्या जयंती निम्मिताने सर्व समाजबांधवाना शुभेच्छा देतो. मागील दीड वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे महामानवाची जयंती समाजबांधव साध्या पद्धतीने साजरी करत आहे. आजही साध्या पद्धतीने जयंती साजरी केली. पण नेहमी जयंती मोठ्या प्रमाणात आणि मिरवणूक काढून साजरी केली जाते. पण कोरोनामुळे साजरी करता आली नाही. यावेळी आनंद पगारे प्रवीण ब्राम्हणे अविनाश  होते. तसेच पुतळ्या जवळ जाताना सॅनिटायझर प्रत्येकाला करावे लागले.

अगदी साध्या सुरक्षित जयंती साजरी झाली व जयंती निम्मिताने अविनाश भालेराव, अशोक मोरे, राजू अहिरे, किशोर डोंगरे, विकास पाटील सर, ए. बी. अहिरे सर यांच्यातर्फे जयंती निमित्त पुतळ्या जवळ शिऱ्याचे वाटप करून लोकांचे तोंड गोड केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज