दुहेरी हत्याकांड : संशयीत आरोपीची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ ।  यावल तालुक्यातील हिंगोणा येथील जियाऊल हक इबादत अली यांच्या शेतामध्ये २५ जुलै २०१७ रोजी एका अज्ञात आरोपीने दोन जणांवर हल्ला केला होता.या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपीची भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.या दुहेरी हत्याकांडातील खटल्यात एकूण १० साक्षीदारांची तपासणी झाली.सबळ पुराव्यांअभावी गुन्ह्यातील आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात आले.

सविस्तर असे की,हिंगोणा येथे २५ जुलै २०१७ रोजी ७ वाजेच्या सुमारास जियाऊल हक इबादत अली यांचे शेतामध्ये मंगला दुर्गेश बारेला, दुर्गेश बारेला यांच्यावर एका अज्ञात आरोपीने हल्ला केला होता. त्यामध्ये मंगला बारेला हिचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे चार ते पाच दिवसांनंतर दुर्गेश बारेला याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासात आरोपी गुरुलाल पांगा बारेला याचे नाव निष्पन्न झाले होते.

या आरोपीला अटक होऊन चार्जशीट दाखल झाले.चार्जशीट दाखल होऊन आरोपी अद्यापही कारागृहात आहे. भुसावळ सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. त्यात एकुण १० साक्षीदार तपासले गेले. आरोपीवर सरकार पक्षातर्फे युक्तीवाद केल्यानंतर सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपी गुरुलाल पांगा बारेला याची निर्दोष मुक्तता केली.आरोपी तर्फे ऍड.प्रफुल्ल आर.पाटील यांनी काम पाहिले.ऍड.संजीव वानखेडे, ऍड.जया झोरे, ऍड.दुर्गेश लहासे यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -