fbpx

डोंगर कठोरा येथे झन्नामन्नाच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे झन्नामन्ना खेळतांना पोलिसांनी धाड टाकून १० जणांसह ३ मोटरसायकली व ५० हजार रुपये रोख असे १ लाख ३ हजाराहुन रक्कम जप्त केली आहे. 

याबाबत असे की, ३० जून रोजी सायंकाळी डोंगर कठोरा गावातील खंडेराव मंदीरा जवळील खुल्या पटांगणावर सार्वजनिक ठिकाणी झन्नामन्ना खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून १० जणांसह ३ मोटरसायकली व ५० हजार रुपये रोख असे १ लाख ३ हजाराहुन रक्कम जप्त केली आहे. 

यासंदर्भात यावल पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलीस अमलदार सुशिल रामदास घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान हे आपले सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत करीत आहे. 

यांच्यावर केली कारवाई?

जगदीश रतन धनगर, मिलींद संतोष कोळी, तुषार वसंत फेगडे, प्रदीप रवीन्द्र भालेराव, गोवींदा सुरेश कोळी, नितिन पंढरीनाथ चौधरी, अन्वर फकीरा तडवी, सुशाल अशोक कोळी, दिलीप कृष्णा तेली, चंदन भिमराव अढाईगे या दहा जणांना कारवाई करण्यात आली. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज