fbpx

फक्त महाराष्ट्रातील मंदिरातच कोरोना येतो का? ; गिरीश महाजनांचा सवाल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । भाजपकडून आज संपूर्ण राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, जामनेर येथे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात शहरातून ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढली. यानंतर घंटानाद आंदोलन करत राज्‍य सरकारचा निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना मोठमोठे कार्यक्रम घेतात. राज्यातील डान्सबार, बिअरबार, बाजारपेठ, मॉल, सिनेमा थेटर सर्व चालू आहे. तसेच अन्‍य राज्यात मंदिरे उघडे आहे. मग महाराष्‍ट्रात का नाही. फक्त महाराष्ट्रातील मंदिरातच कोरोना येतो का? असा सवाल आमदार गिरीश महाजन यांनी यावेळी केला. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी कोणतेही नियमाला घाबरणार नसून तुम्ही पोलिस उभे करा; आम्ही आजपासून राज्यातील मंदिरे उघडे करू अशी प्रतिक्रिया महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यांची होती उपस्थिती

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक नाना बाविस्कर, नाना वाणी, सुहास पाटील, बाबुराव हिरवळे, बंटी वाघ, भाजपा तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश नाईक, सरचिटणीस सुभाष पवार, रामकिसन नाईक, अजय नाईक, पुखराज डांगे यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज