fbpx

चक्क… दवाखान्यातून डॉक्टरचाच मोबाईल, पाकीट लांबविले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या अमन पार्कमधील एका दवाखान्यातून चक्क डॉक्टरचा मोबाइल आणि पाकीट लंपास केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला आहे.

अमन पार्क परिसरात डॉ.जाकिर खान यांचा पठाण क्लिनिक नावाने १५ वर्षापासून दवाखाना आहे. रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे काचेचा दरवाजा लॉककरून नमाज पठण करण्यासाठी गेले होते. काही वेळाने ते परत आले असता त्यांना कॅबिनमधील मोबाइल आणि पाकीट दोघे आढळून आले नाही. डॉक्टरांच्या कॅबिनला वरील बाजूने असलेल्या जागेतून चोरट्याने आतमध्ये प्रवेश करून चोरी केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहोचले असून तपास सुरू आहे.

pathan clinic

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt