जळगावच्या धुळीने झाले बेजार ; फुफ्फुसे तंदरुस्त ठेवण्यासाठी करा हे उपाय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा टप्पा ओसरला असून तिसरी लाट नक्की येणार आहे. आपल्याकडे बहुतांश लोकांना कोरोना होऊन गेला असल्याने तिसरी लाट सौम्य असू शकते. जळगावात धुळीमुळे फुफ्फुसांचे आजार बळावण्याचा धोका अधिक असून सकाळच्या वेळी फिरणे, व्यायाम करण्यासह शुद्ध हवा घेणे देखील आवश्यक असल्याचे छातीरोग तज्ञ डॉ.कल्पेश गांधी यांनी सांगितले.

डॉ.गांधी यांनी सांगितले की, फुफ्फुसे हे दोन शंकुच्या आकारचे अवयव छातीच्या दोन्ही बाजूला असून त्यांचे मुख्य काम म्हणजे शरीरात ऑक्सीजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणे आहे. मानवीय शरीर हे दरवर्षी साठ लाख वेळा श्वासोश्वास घेत असून चार मिनीटांपेक्षा जास्त शरीर ऑक्सीजनपासून वंचित राहिल्यास मेंदु मधल्या पेशींना नुकसान होण्यास सुरुवात होते आणि नंतर त्या मृत होतात आणि शेवटी शरीराचा मृत्यु होतो असे त्यांनी सांगितले.

फुफ्फुसांच्या संसर्गजन्य रोगामुळे एका दशकात २६ लाख मृत्यू 

वयोमानानुसार जसे गुडघे, डोळे आणि इतर शरीराच्या अवयवयांची जशी झीज होते तशीच फुफ्फुसांची सुध्दा होत असते. वयाच्या विसाव्या वर्षापर्यत फुफ्फुसांची कार्यक्षमता ही सर्वात जास्त असते आणि नंतर जसे वय वाढते तसे ती कमी होते. भारत सरकारने 6 ऑगस्ट 2015 रोजी संसदेत फुफ्फुसांना तंदुरूस्त ठेवण्याचे महत्व मान्य केले. तेव्हा मागील दशकापर्यत फुफ्फुसांच्या संसर्गजन्य रोगामुळे 26 लाख लोग मृत्युमुखी पावले होते, असे डॉ.गांधी यांनी सांगितले.

फुफ्फुसांना स्वस्थ ठेवण्याचे सोपे फंडे

डॉ.गांधी यांनी सांगितलेल्या काही सोप्या उपाय उपायांमुळे फुफ्फुसांच्या आजाराचा धोका कमी होईल आणि थंडी आणि फ्लुच्या हंगामात तुम्ही निरोगी राहू शकतात.

1. धुम्रपान टाळा, धुम्रपान केल्याने क्रोनिक ब्रॉनकायटीस (Cronic bronchitis) आणि एम्फायसेमा (Emphysema) या सारखे श्वसनाचे आजार उदभवतात.

2. निष्क्रिय धुम्रपानापासून दुर रहा. सार्वजनीक ठिकाणी अथवा बंद खोलीत धुम्रपान करणा-या व्यक्तीमुळे वरील त्रास धुम्रपान न करणा-यास पण होवू शकतो.

3. ई-सिगरेट पासून दुर रहा – धुर उत्पन्न न करणा-या इलेक्ट्रॉनीक सिगरेट सुध्दा विविध विषारी घटके निर्माण करतात.

4. प्रदुषण घटक कमी करा. आपल्या वाहनांची वेळोवेळी सर्विसिंग करा, बाहेर जाताना मास्क घाला.

5. घरातील प्रदूषण टाळा – डास पळवण्यासाठी वापरण्यात येणारे मॉस्कीटो कॉईल हे 100 सिगरेट इतका धुर निर्माण करतात तसेच Deodrant spray या मधून घातक वायू बाहेर पडतात.

6. पोटाचा घेर कमी करा- लठठ व्यक्तींना पोटाच्या जास्त घेरामुळे, श्वास घेण्यासाठी प्राथमिक स्नायु डॉयफ्रेम (Diaphragm) ला योग्य काम करता येत नाही.

7. घाम येईपर्यत व्यायाम करा. सुदृढ जेवण करा जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, प्रथिने यांचे प्रमाण वाढवा.

9. श्वसनाचे व्यायाम करा.

10. भरपुर पाणी प्या, भरपूर पाणी पिल्याने कफ मोकळा होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते.

11. मत्स्य तेल सेवन करा – मत्स्य तेलामध्ये आढळणारे 17 HDHA अस्थमा होण्याचे प्रमाण कमी करतो. IgE नावाच्या अँटीबॉडीचे उत्पादन शरीरात कमी करण्यास मदत करते.

12. वेळोवेळी फ्ल्यु, न्युमोनिया आणि कोविडची लस घ्या. फ्ल्युची लस दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये घ्यावी. न्युमोनियाची लस दर पाच वर्षांनी तसेच कोविडचे सध्या असलेले दोन डोस घेणे आवश्यक आहे.

13. श्वसनाच्या त्रासाला दुर्लक्षीत करू नका. श्वसनाचा त्रास होत असल्यास डॉक्टरकडून तपासणी करून ती कोणत्या कारणामुळे होतोय हे जर वेळीच निदान झाल्यास उदभवणारा आजार लवकर बरा किंवा आटोक्यात येऊ शकतो.

14. वर्षातून दोन वेळा दातांची तपासणी करा. तोंडामधील बॅक्टेरिया हे श्वसनाद्वारे फुफ्फुस्सात जाऊन न्युमोनिया करू शकतात.

15. फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी वयाच्या 55 नंतर तपासणी करून घ्या, उतरत्या वयात कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेत, Low dose, CT Scan, वयाच्या 55 नंतर करून घ्यावे.

16. आले, हळद, ओवा यांचा पुरक वापर करा.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -