काँग्रेस ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । तोंडापूर ( ता. जामनेर ) येथील संजय गांधी निराधार समितीचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील (तोंडापूर) यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

त्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश व्हीजेएनटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, वडाळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुधाकर पाटील, अन्य तालुक्यातील कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. त्यांनी संजय गांधी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या कामामुळे काँग्रेसचे एकनिष्ठपणे काम करत असल्याने पक्षाने तालुक्यात काँग्रेस पक्षाचे संघटना वाढवण्यासाठी ओबीसी विभागाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने तोंडापूर परिसरात अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -