दिवाळी स्पेशल रेसीपी : खमंग मक्याचा चिवडा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ नोव्हेंबर २०२१ । दिवाळी म्हटली की, विविध प्रकारचे फरार आपल्याला समोर दिसतात. दिवाळीत स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, भाकरवडी अशा अनेर रेसिपींची मेजवाणीच असते. दरम्यान, आज आपण खमंग मक्याचा चिवडा कसा बनवला जातो, हे जाणून घेणार आहोत.

साहित्य – मक्याचे पोहे – तीन मोठी कटोरी, शेंदाणे – अर्धी वाटी, डाळे – अर्धी वाटी, जिरे – दोन चमचे, सौफ – एक लहान चमचा, अख्खा धणा – एक चमचा, कढीपत्ता – अर्धी वाटी, हळद – दोन लहान चमचे, तिखट मीठ – चवीनुसार, किसमीस काजू टुकडे – पाव वाटी, खोबरा काप – पाव वाटी, तळण्यासाठी तेल. makai chiwada 250x250 1

कृती – कढाईत तेल गरम करावे, मकई पोहा तळून एका मोठ्या परातीत घ्यावा. तेलात शेंदाणे व खोबरा काप तळून घ्यावे. त्यातच स्टीलची गडाई ठेवून जिरे, धणा, सौफ टाळून घ्यावी. कढीपत्ता तळून घ्यावा. आता काजूचे काप व किसमीस तळून घ्यावी. कढीपत्ता सोडून बाकी सर्व पोह्यात मिक्स करावे. तिखट मीठ व हळद टाकून सर्व व्यवस्थित हळुवार एकत्र करावे. शेवटी काजू व किसमीस व कढीपत्ता टाकून एकत्र करावे. अतिशय खमंग अनोखा चिवडा तयार होतो.

चवड रसप च मखय फट

सौ. मिनाक्षी प्रकाश वाणी – जळगाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज